आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६

शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये 'चौकीदार' (गट-ड) पदांची महाभरती

पदाचे नाव: चौकीदार (Watchman)
अर्ज मुदत: २७ एप्रिल ते १८ मे २०२६
शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण

संक्षिप्त माहिती: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग (Tribal Development Department) नाशिक आयुक्तालयाच्या अंतर्गत राज्यातील २९ 'एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पां'च्या (ITDP) आस्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये 'चौकीदार' (गट-ड) संवर्गाची सरळसेवा भरती २०२६ राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, अर्जाची प्रक्रिया २७ एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे.

महत्त्वाचे वेळापत्रक (Important Dates)

भरती प्रक्रियेतील ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्काचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

Adivasi Vikas Vibhag Chaukidar Bharti 2026 Schedule
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख:२७ एप्रिल २०२६ (दुपारी १५:०० पासून)
ऑनलाईन अर्ज करण्याची व शुल्क भरण्याची अंतिम मुदत:१८ मे २०२६ (रात्री २३:५५ पर्यंत)
ऑनलाईन संगणक आधारित परीक्षा (CBT) दिनांक:विभागाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.

प्रकल्पनिहाय रिक्त पदांचा तपशील (Vacancy Details)

२९ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमध्ये (ITDP) चौकीदार पदांच्या रिक्त जागांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे:

राजूर (अहिल्यानगर) १५ पदे
धुळे २९ पदे
तळोदा (नंदुरबार) ३० पदे
नाशिक ३४ पदे
नंदूरबार २३ पदे
कळवण (नाशिक) ४२ पदे
यावल (जळगाव) ०९ पदे
घोडेगाव (पुणे) २६ पदे
शहापूर (ठाणे) १९ पदे
पेण (रायगड) ११ पदे
जव्हार (पालघर) १७ पदे
डहाणू (पालघर) २४ पदे
सोलापूर ०५ पदे
छ. संभाजीनगर १२ पदे
पुसद (यवतमाळ) ०८ पदे
धारणी (अमरावती) १९ पदे
किनवट (नांदेड) ०२ पदे
कळमनुरी (हिंगोली) ०२ पदे
अकोला १३ पदे
पांढरकवडा (यवतमाळ) ०३ पदे
चिमूर (चंद्रपूर) ०७ पदे
चंद्रपूर १५ पदे
गडचिरोली ०९ पदे
भामरागड (गडचिरोली) ०५ पदे
भंडारा ०५ पदे
देवरी (गोंदिया) १६ पदे
नागपूर ०८ पदे
वर्धा ०६ पदे
अहेरी (गडचिरोली) ०२ पदे

(टीप: उमेदवार कोणत्याही एकाच आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत अर्ज करू शकतो.)

शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)

१. शैक्षणिक अर्हता (Education)

  • उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (SSC / १० वी) उत्तीर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.
  • अर्हता गणण्याचा दिनांक: ०१ एप्रिल २०२६ रोजी शैक्षणिक अर्हता पूर्ण असावी.

२. वयोमर्यादा (Age Limit as on 01.04.2026)

प्रवर्ग (Category)किमान वयकमाल वय
खुल्या प्रवर्गातील उमेदवार (Open)१८ वर्षे३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवार (Reserved)१८ वर्षे४३ वर्षे
प्राविण्यप्राप्त खेळाडू आणि अनाथ१८ वर्षे४३ वर्षे
दिव्यांग आणि माजी सैनिक१८ वर्षे४५ वर्षे
अंशकालीन उमेदवार१८ वर्षे५५ वर्षे

वेतनश्रेणी आणि परीक्षेचे स्वरूप (Salary & Exam Pattern)

वेतनश्रेणी (Pay Scale):S-1: रु. १५,००० - ४७,६००/-

परीक्षेचे स्वरूप (Computer Based Test)

उमेदवारांची निवड संगणक आधारित (CBT) ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्यासाठी उमेदवाराला किमान ४५% गुण मिळवणे आवश्यक आहे.

विषय (Subjects)गुण (Marks)एकूण गुण (Total)कालावधी (Time)
मराठी (Marathi)५०२०० गुण१२० मिनिटे
(२ तास)
इंग्रजी (English)५०
सामान्य ज्ञान (General Knowledge)५०
बौद्धिक चाचणी (Intelligence Test)५०

परीक्षा शुल्क (Application Fee)

ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी खालीलप्रमाणे परीक्षा शुल्क (Non-refundable) ऑनलाईन भरायचे आहे:

उमेदवाराचा प्रवर्ग (Category)परीक्षा शुल्क (Exam Fee)
अमागास (Open Category)रु. १०००/-
मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांगरु. ९००/-
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिकशुल्क माफ (Nil)

ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to Apply)

पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून (tdcwatchman2026.cbtexam.in) ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. सर्वप्रथम https://tdcwatchman2026.cbtexam.in या वेबसाईटवर जाऊन 'नवीन नोंदणी' (New Registration) करा.
  2. नोंदणी करताना स्वतःचे नाव, ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक अचूक भरा.
  3. प्रणालीद्वारे मिळालेला Registration No. आणि Password जतन करून ठेवा.
  4. लागिण करून अर्जात स्वतःची वैयक्तिक, शैक्षणिक आणि प्रकल्प पसंतीची माहिती भरा.
  5. पुढील कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा:
    • पासपोर्ट साईझ रंगीत फोटो (4.5x3.5 cm, 20-50 KB)
    • काळ्या शाईने केलेली स्वाक्षरी (10-20 KB)
    • डाव्या अंगठ्याचा ठसा (20-50 KB)
    • इंग्रजी भाषेतील स्वहस्ताक्षरातील घोषणापत्र (Declaration - 50-100 KB)
  6. माहिती तपासून (Preview) फॉर्म 'Submit' करा आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरा.
  7. अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाल्यावर ई-पावती (E-Receipt) आणि अर्जाची प्रिंट काढून जवळ ठेवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

१. आदिवासी विकास विभाग चौकीदार भरती २०२६ साठी कोण अर्ज करू शकतो?

ज्या उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (दहावी / SSC) उत्तीर्ण केली आहे, ते या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

२. या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे?

०१ एप्रिल २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे. खुल्या प्रवर्गासाठी कमाल ३८ वर्षे आणि मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे वयोमर्यादा आहे.

३. उमेदवार एकापेक्षा जास्त प्रकल्पांसाठी अर्ज करू शकतो का?

नाही. उमेदवार कोणत्याही एकाच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रांतर्गत असलेल्या पदांसाठी अर्ज करू शकेल.

४. परीक्षेचे स्वरूप कसे असेल?

ही परीक्षा संगणक आधारित (CBT) ऑनलाईन पद्धतीने होईल. यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रत्येकी ५० गुण असे एकूण २०० गुणांची बहुपर्यायी चाचणी २ तासांसाठी घेतली जाईल.

५. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

पात्र उमेदवार १८ मे २०२६ रोजी रात्री २३:५५ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.

६. अर्जासोबत कोणते 'घोषणापत्र' (Declaration) अपलोड करणे आवश्यक आहे?

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या इंग्रजी मजकुरातील (Declaration) स्वहस्ताक्षराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहून स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

⚠️ Disclaimer / अस्वीकरण:

ही माहिती केवळ उमेदवारांच्या संदर्भासाठी आणि त्यांच्या सोयीस्कर मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आली आहे. वरील सर्व माहिती आयुक्त, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत जाहिरातीवर (जाहिरात क्रमांक: आस्था- पद भरती-2025/प्र.क्र. 65 / का.2(8)/ नाशिक, दिनांक 27 एप्रिल 2026) आधारित आहे. कोणतीही अंतिम कृती करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत संकेतस्थळावरून (tribal.maharashtra.gov.in) मूळ अधिसूचनेची पडताळणी स्वतः करावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top